-
भारताच्या महिला संघाची सलामीवीर फलंदाज प्रतिका रावल हिने इन्स्टाग्रामला काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या लूकने सर्वांचं वेधून घेतलं आहे.
-
प्रतिका रावल महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाचा भाग होती. स्मृती मानधनासह तिने विश्वचषकात खोऱ्याने धावा केल्या.
-
प्रतिका रावल ही स्मृती मानधनानंतर वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज होती.
-
प्रतिकाला सेमीफायनल व फायनलपूर्वीच्या अखेरच्या गट टप्प्यातील सामन्यात पायाला दुखापत झाली होती. तिची दुखापत इतकी गंभीर होती की ती उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडली.
-
भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी पायाला फ्रॅक्चर असलेली प्रतिका व्हिलचेअरवरून स्टेडियममध्ये पोहोचली होती. भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर प्रतिका संपूर्णस संघासह सेलिब्रेट करताना दिसला.
-
भारतीय महिला संघाच्या विजयानंतर प्रतिका रावलचा बोल्ड अंदाज दिसून आला. या लूकमधील पोस्टमध्ये चाहत्यांनी क्रश अपडेटेड अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
प्रतिका रावलने एका शूटसाठी हा सुंदर लूक केला आहे. यामधील प्रतिकाचा लूक, तिचा आऊटफिट व तिचा मेकअपने सर्वांचं लक्ष वेधलं.
-
प्रतिकाच्या या फोटोमध्येही तिच्या पायाचं फ्रॅक्चर दिसून येत आहे.(फोटो सौजन्य-@PratikaRawal Instagram)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…