-
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चे जेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली संघाने ही उत्कृष्ट कामगिरी केली.
-
हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा या चार खेळाडूंसह ग्रुप फोटोशूट केलं आहे. तर यादरम्यान सिंगल फोटोजही वोग इंडियाने त्यांच्या ऑफिशियल पेजवर शेअर केले आहेत.
-
कर्णधार हरमनप्रीत कौरचा हटके लूक सर्वात आधी वोगने शेअर केला होता. महिला संघाचा हा वर्ल्डकप विजय देशातील इतर महिलांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देतील, असं अनेकदा हरमनने म्हटलं आहे.
-
शफाली वर्मा व हरमनप्रीत कौरचा एक फोटो शेअर केला आहे. हरमनने छान स्कर्ट व बॉडीसूट घातला आहे, ज्यामध्ये हिरवा, काळा, पांढरा असे मिक्स रंग आहेत. तर शफालीने डेनिम शर्ट, टाय आणि पँट घातली आहे.
-
शफाली वर्माच्या साई़ड प्रोफाईल फोटोमध्ये तिच्या हेअरस्टाईलवर फोकस आहे. शफालीने क्रिकेट खेळण्यासाठी तिचे केस कापले होते… तिच्या हेअरस्टाईलबद्दल जेव्हा चर्चा झाली; तेव्हा शफाली म्हणाली, “मी क्रिकेटसाठी माझे केस कापले आणि क्रिकेटने मला यश मिळवून दिलं. लोकांना जे म्हणायचं आहे ते म्हणू दे.”
-
हरमन, दीप्ती, प्रतिका, शफाली चार जणींचा अजून एक ग्रुप फोटो आहे, ज्यामध्ये चौघींचाही अजून वेगळा आणि हटके लूक आहे.
-
दीप्ती शर्माने छान वुलनचं स्वेटर घातलं आहे आणि खाली असलेल्या जीन्सवर छान वर्क केलेलं आहे. दीप्ती स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू आहे.
-
दीप्ती व प्रतिका रावलचा हसतानाचा एक छान कँन्डिड फोटो शेअर केला आहे.
-
प्रतिका रावलच्या या फोटोशूटमधील फोटोने विशेष लक्ष वेधलं आहे. वोग इंडियाचे फोटो समोर येण्यापूर्वी प्रतिकाने तिच्या अकाऊंटवरून पोस्ट केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य:@VogueIndia Instagr)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव