-
आयपीएल २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या काही दिवसात या स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्याआधी सर्व संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या संघाला किती खेळाडू हवे आहेत, हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संघांची घोषणा होण्यापूर्वी काही संघांनी खेळाडूंची अदलाबदल केली. सर्वात मोठी अदलाबदल म्हणजे, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना, आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिला ट्रेड कधी आणि कोणत्या २ संघांमध्ये झाला होता, तर जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या स्पर्धेतील पहिला ट्रेड २००९ मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेव्हिल्स) या दोन्ही संघांमध्ये झाला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्से वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या जागी दिल्लीकर शिखर धवनला संघात स्थान दिलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?