-
गेल्या हंगामात रजत पाटीदारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जेतेपद मिळवून दिलं होतं. या हंगामातही तो या संघाचा कर्णधार असेल. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे असणार आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गेल्या हंगामात लखनौने ऋषभ पंतची कर्णधार म्हणून निवड केली होती. या हंगामातही तो संघाचं नेतृत्व करताना दिसेल. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे असणार आहे . (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडली आहे. त्यामुळे या संघाला नव्या हंगामात नवा कर्णधार मिळू शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गेल्या हंगामात अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. पण यावेळी त्याला ही जबाबदारी मिळणार की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चेन्नई सुपर किंग्ज संघात संजू सॅमसनची एंट्री झाली आहे. पण या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे दिली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Video: मराठी अभिनेत्री करतेय दुसरं लग्न, केळवणाचा व्हिडीओ केला शेअर; ३ महिन्यांपूर्वीच केली घटस्फोटाची घोषणा