-
स्मृती मानधना आणि सिने संगीतकार व निर्माता पलाश मुच्छल यांचा २३ नोव्हेंबरला विवाह सोहळा पार पडणार आहे.
-
स्मृती-पलाशचं लग्न सांगलीत होत आहे. तिच्या लग्नासाठी भारतीय महिला संघातील तिच्या खास मैत्रिणी पोहोचल्या आहेत.
-
स्मृती मानधनाचा हळदी समारंभ शुक्रवारी २१ नोव्हेंबरला पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
स्मृतीच्या मेहंदी सोहळ्याचे काही कमाल फोटो जेमिमा रॉड्रीग्जने शेअर केले आहेत. जेमिमाने स्मृतीसह ग्रुप फोटो शेअर केला आहे.
-
स्मृतीने तिच्या मेहंदीसाठी जांभळ्या रंगाचा आऊटफिट घातला असून सुंदर मेकअपही केला आहे.
-
जेमिमा रॉड्रीग्जने तिच्या हातावरील मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने हातावर Manduuu असं लिहिलं आहे. मानधना या नावाचा शॉर्ट फॉर्म तिने लाडक्या मैत्रिणीच्या लग्नासाठीच्या मेहंदीमध्ये प्रेमाने लिहिला आहे.
-
स्मृती व पलाशचा मेहंदी लूकमधील गोड फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
शफाली वर्मा व श्रेयंका पाटील यांचा सेल्फीही यादरम्यान पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य-@Jemimah Rodrigues, Shafali Verma Instagram)
मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित; मंत्री झिरवाळ कोणाच्या निशाण्यावर? मुख्यमंत्री यांची का घेतली भेट?