-
पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागली होती. पण एक असा खेळाडू होता, ज्याच्यावर बोली लावली गेली नव्हती. पुढील १७ हंगामातही बोली लावली गेलेली नाही. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरूवात झाली होती. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अंडर १९ वर्ल्डकप २००८ स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवल्यानंतर विराट कोहली तुफान चर्चेत होता. त्यावेळी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंडर-१९ ड्राफ्टमधून थेट आपल्या संघात सामील करून घेतले होते.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्पर्धेतील पहिल्या हंगामापासून ते प्रत्येक मेगा ऑक्शनपर्यंत त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या संघात कायम ठेवलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट एकमेव असा खेळाडू आहे, जो पहिल्या हंगामापासून एकाच संघाकडून खेळत आहे. १७ वर्ष वाट पाहिल्यानंतर १८ व्या वर्षी या संघाने पहिल्यांदा जेतेपदाचा मान पटकावला होता.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शिंदे गटाचे २५ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत? शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वाचा ५ घडामोडी…