-
स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचा २३ नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा होणार होता, पण तिच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तिचं लग्न रद्द करण्यात आलं.
-
स्मृती मानधनाच्या संपूर्णाचे कुटुंबाचे फोटो आपण अनेकदा पाहिले आहेत. पण तिच्या कुटुंबात नेमकं कोण कोण आहे व सर्व जण काय करतात, जाणून घेऊया.
-
स्मृती मानधनाच्या बाबांचं नाव श्रीनिवास मानधना आहे. ते स्वत: एक क्रिकेटपटू होते आणि त्यांनी सांगलीसाठी क्रिकेट खेळलं आहे. ते व्यवसायाने केमिकल डिस्ट्रिब्युटर आहे, तर आता तिचे बाबा सांगलीत SM18 कॅफे चालवतात.
-
स्मृती मानधनाच्या आईचं नाव स्मिता मानधना आहे. त्या गृहिणी आहेत.
-
स्मृतीच्या क्रिकेट कारकिर्दीत तिच्या आई-वडिलांनी तिला संपूर्ण पाठिंबा दिला.
-
स्मृती मानधनाला मोठा भाऊ आहे, ज्याचं नाव श्रवण मानधना आहे. श्रवण मानधनाने देखील महाराष्ट्रसाठी अंडर-१९ क्रिकेट खेळलं आहे. आता तो बँकर असून SM18 कॅफे व टर्फची जबाबदारीही सांभाळतो.
-
स्मृतीने तिच्या भावाला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्यानंतर तिने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. ती ४ वर्षांची असल्यापासून तिच्या वडिलांबरोबर भावाचा सराव पाहायला जात असे.
-
स्मृतीचा भाऊ श्रवणचं लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव कधी समोर आलं नाही. श्रवणने १० जुलै २०१८ ला लग्न केलं.
-
श्रवणला एक मुलगा आहे ज्याचं नाव ह्रिनय मानधना आहे. त्याचा जन्म ९ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला. स्मृतीच्या लग्नापूर्वीच्या विधींमध्ये तो अनेकदा बागडताना दिसला आहे.
-
मानधना कुटुंबामध्ये पलाश मुच्छल हा नवा सहावा व्यक्ती आता येणार आहे. स्मृती पलाश यांचं लग्न रद्द झाल्यानंतर आता पुन्हा लग्न कधी होणार याची तारीख अजून समोर आलेली नाही.(फोटो सौजन्य- Smriti mandhana Instagarm)
Iran Vs Israel War : इराणने इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र डागली; क्षेपणास्त्रावर ‘Thank You India’ लिहित काय संदेश दिला?