-
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या सुमार कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान गौतम गंभीर, राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये कसा रेकॉर्ड राहिला आहे, जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गौतम गंभीर हा वर्तमान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने १९ सामने खेळले आहेत. त्यापैकी ७ सामने भारताने जिंकले आहेत. तर १० सामने गमावले आहेत. यादरम्यान २ सामने अनिर्णित राहिले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने २४ पैकी १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर ७ सामने गमावले होते आणि ३ सामने अनिर्णित राहिले होते.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ४३ सामने खेळले आहेत. त्यापैकी २५ सामने जिंकले आहेत. तर १३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
दोनच दिवसात खोकला कायमचा जाईल; फक्त दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या, परिणाम पाहून थक्क व्हाल