-
भारतीय महिला संघातील स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध दमदार शतकी खेळी करून भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या खेळीच्या बळावर भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या विजयानंतर भारतीय महिला संघातील खेळाडू सांगलीत दाखल झाले होते. स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचा विवाह होणार होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पण विवाह होण्याच्या काही तासांपूर्वी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याच कारणास्तव स्मृती आणि पलाशचा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्मृतीचा विवाह झाल्यानंतर जेमिमा वुमन्स बिग बॅश लीग खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होती. पण आपल्या मैत्रिणीच्या कठीण काळात तिला समर्थन करण्यासाठी तिने या स्पर्धेसाठी जाण्यास नकार दिला आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ती वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत ब्रिसबेन हिट संघाचं प्रतिनिधित्व करते. ब्रिसबेन हिटची तिची विनंती मान्य केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित; मंत्री झिरवाळ कोणाच्या निशाण्यावर? मुख्यमंत्री यांची का घेतली भेट?