-
जो रूटने अॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. रूटचं कसोटी कारकिर्दीतील हे ४०वं शतक आहे.
-
जो रूटने २०६ चेंडूत १५ चौकार व एका षटकारासह १३८ धावांची खेळी केली. पिक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध इंग्लंडच्या फलंदाजाची ही सर्वात मोठी खेळी आहे.
-
जो रूटच्या शतकासह आता कसोटीत सर्वाधिक शतकं करणारे टॉप-५ फलंदाज कोण आहेत, जाणून घेऊया.
-
सचिन तेंडुलकर-मास्टर ब्लास्टरने कसोटी क्रिकेटमध्ये २०० कसोटी सामन्यातील ३२९ डावांमध्ये ५१ शतकं केली आहेत, जो या यादीत अव्वल स्थानी आहे.
-
जॅक कॅलिस-दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू फलंदाज जॅक कॅलिस १६६ सामन्यांमधील २८० डावांमध्ये ४५ शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
-
रिकी पॉन्टिंग-ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार तिसऱ्या क्रमांकावर असून १६८ सामन्यांमधील २८७ डावांमध्ये ४१ शतकं केली आहेत.
-
जो रूट- चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या अनुभवी फलंदाजाने १६० सामन्यांमधील २९१ डावांमध्ये ४० शतकं केली आहेत.
-
कुमार संगकारा-श्रीलंकेचा हा फलंदाज १३४ सामन्यांमधील २३३ डावांमध्ये ३८ शतकांसह पाचव्या स्थानी आहे.
US F-15 Pilot Rescue Operation: “गॉड इज ग्रेट!” अमेरिकी पायलटच्या ‘त्या’ ३ शब्दांनी उडाला गोंधळ; इराणच्या जबड्यातून कशी केली सुटका?