-
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस कसोटी मालिका खेळवली जात आहे. यामधील दुसऱ्या कसोटीत जो रूटने उत्कृष्ट झळकावलं आहे.
-
जगातील अनेक मैदानांवर खोऱ्याने धावा करणाऱ्या जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कधीही कसोटी शतक केलं नव्हतं. हे शतक त्याने आता २०२५ च्या अॅशेस मालिकेत केलं.
-
जो रूटने दुसऱ्या कसोटीत २०६ चेंडूत १५ चौकार व एका षटकारासह १३८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वात मोठी खेळी करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला.
-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. पण आता हा विक्रम मोडण्याच्या जो रूट जवळ येत आहे.
-
सचिन तेंडुलकरने कसोटीत १५९२१ धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरने केला आहे. तर आता जो रूट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
-
जो रूट १३६८९ कसोटी धावांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. यासह जो रूट सचिनचा विक्रम मोडण्यापासून २२३२ धावांनी दूर आहे.
-
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो रूट आता ३४ वर्षांचा आहे, त्यामुळे सचिनचा हा विक्रम रूट मोडणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.
हनुमान जयंतीला ध्रुव योग जुळून आल्याने चहूबाजूंनी बरसणार सुख; चिंता मिटतील, इच्छा पूर्ण होतील; तुमच्या नशिबात आज काय?