-
भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. पण टी-२० क्रिकेटमध्ये तो स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. गेल्या १४ डावात त्याला एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. गिलला संधी दिली जात असल्याने संजू सॅमसनला संधी मिळणं कठीण झालं आहे. दरम्यान सलामीवीर म्हणून कसा आहे दोघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या. (फोटो- एक्स)
-
संजू सॅमसनला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला १७ सामन्यांमध्ये डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली आहे. (फोटो- एक्स)
-
तर दुसरीकडे शुबमन गिलला ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सर्व सामन्यांमध्ये त्याला डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली आहे. (फोटो- एक्स)
-
संजू सॅमसमने १७ सामन्यांमध्ये ३२.६२ च्या सरासरीने ५२२ धावा केल्या आहेत. (फोटो- एक्स)
-
तर शुबमन गिलने ३५ सामन्यांमध्ये डावाची सुरूवात करताना २८.०३ च्या सरासरीने ८४१ धावा केल्या आहेत. (फोटो- एक्स)
-
संजू सॅमसनला सलामीवीर म्हणून फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पण त्या मानाने त्याने शुबमन गिलहून चांगली फलंदाजी केली आङे. धावा करण्याच्या बाबतीत आणि सरासरीच्या बाबतीत संजू सॅमसन शुबमन गिलच्या खूप पुढे आहे. (फोटो- एक्स)
माधुरी दीक्षित पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! कारण आहे खूपच खास, डॉ. नेने म्हणाले, “प्रेमळ आदरातिथ्य…”