-
येत्या १६ डिसेंबरला आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी मिनी ऑक्शन होणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ २.७५ कोटी इतक्या कमी रकमेसह ऑक्शनमध्ये उतरणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ अशा काही खेळाडूंच्या शोधात असेल, जे कमी किमतीत उपलब्ध होतील. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जोडीला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मुंबईचा संघ देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या के.एम. आसिफवर बोली लावू शकतो. (फोटो- एक्स)
-
मिडल ऑर्डरमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी MI एक आक्रमक फलंदाज शोधत आहे. ही जागा भरून काढण्यासाठी पंजाबचा फलंदाज अनमोलप्रीत सिंग उत्तम पर्याय ठरू शकतो. (फोटो- एक्स)
-
मुंबई इंडियन्सला राखीव यष्टीरक्षक फलंदाजाची देखील गरज आहे. त्यामुळे मुंबईचा संघ मुकुल चौधरी सारख्या खेळाडूवर बोली लावू शकतो. (फोटो- एक्स)
-
यासह कार्तिक शर्माला देखील संघात घेण्याच्या प्रयत्नात असू शकतो. (फोटो- एक्स)
-
विदेशी खेळाडूसाठी एकज जागा शिल्लक असल्याने मुंबईचा संघ जॉर्ज लिंडे किंवा लुंगी एन्गिडीला आपल्या संघात घेऊ शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शोभन योगात राम नवमी! ३ राशींचा सुरु होईल शुभ काळ; कोणाला लाभेल सुख-समृद्धी तर कोणाला होईल धनलाभ; बघा तुमची रास आहे का नशीबवान