-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गेल्या १८ वर्षांपासून जेतेपदाच्या प्रतिक्षेत होता. अखेर २०२५ मध्ये या संघाने पहिल्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान आगामी हंगामात हा संघ आणखी मजबूत संघबांधणी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान १६ डिसेंबरला होणाऱ्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ४ खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावू शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंग्स्टनला रिलीज केल्यानंतर मध्यक्रमातील फलंदाजी मजबूत करायची आहे. त्यामुळे व्यंकटेश अय्यर डाव्या हाताचा फलंदाज म्हणून संघाला संतुलन देऊ शकतो आणि तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीची समस्या सोडवू शकतो.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीला रिलीज केल्यामुळे, RCB ला जोश हेझलवूडसाठी एका विदेशी वेगवान गोलंदाजाचा बॅक-अप हवा आहे. त्यासाठी गेराल्ड कोएत्झी उत्तम पर्याय ठरू शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान डेथ ओव्हर्समधील त्याच्या अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे हा संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावू शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आकाश मधवाल हा आयपीएलमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला खेळाडू आहे. मुंबई इंडियन्ससाठी त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?