-
आयपीएल २०२६ चा लिलाव अबुधाबी एतिहाद एरिनामध्ये पार पडला. या लिलावात महाराष्ट्र, विदर्भ व मुंबई संघांतील ११ खेळाडूंवर बोली लागली आहे.
-
ओंकार तारमाळे हा मुंबई क्रिकेट संघाचा खेळाडू असून त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने ताफ्यात सामील केलं. त्याला मूळ किंमतीला ३० लाखांना संघात घेतलं आहे.
-
प्रफुल्ल हिंगे हा विदर्भकडून क्रिकेट खेळतो. प्रफुलला देखील सनरायझर्स हैदराबाद संघाने ३० लाखांना आपल्या ताफ्यात सामील केलं.
-
पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या वेळेस बोली लावत ७५ लाखांना सामील केलं. पृथ्वी यंदाच्या हंगामात मुंबईची साथ महाराष्ट्र संघातून क्रिकेट खेळताना दिसत आहे.
-
विकी ओत्सवाल हा महाराष्ट्रकडून क्रिकेट खेळतो, तो आता गतविजेत्या आरसीबी संघाकडून खेळणार आहे. आरसीबीने त्याला ३० लाखांना ताफ्यात सामील केलं.
-
सर्फराझ खान हा मुंबईचा आक्रमक फलंदाज असून तो आता चेन्नई संघातून आयपीएल खेळताना दिसेल. चेन्नईने सर्फराझला ७५ लाखांना ताफ्यात सामील केलं.
-
अमन खान मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्स संघातून आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. त्याला चेन्नईने ४० लाखांना ताफ्यात सहभागी केलं.
-
प्रशांत सोळंकी महाराष्ट्र क्रिकेट संघाचा खेळाडू असून त्यालादेखील केकेआरने ३० लाखांना पुढील हंगामासाठी संघाचा भाग बनवलं आहे.
-
राहुल त्रिपाठी हा आयपीएलमधील अनुभवी खेळाडू महाराष्ट्रकडून क्रिकेट खेळतो, ज्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून ७५ लाखांना ताफ्यात सामील केलं.
-
दानिश मालेवार विदर्भ संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. दानिशला मुंबई इंडियन्सने ३० लाख मूळ किमतीला लिलावात खरेदी केलं.
-
अथर्व अंकोलेकर मुंबई क्रिकेट संघाचा भाग आहे, ज्याला मुंबई इंडियन्सनने आगामी हंगामासाठी ३० लाखांच्या मूळ किमतीला ताफ्यात सामील केलं.
-
साहिल पारख हा महाराष्ट्र नाशिकचा खेळाडू असून तो दिल्लीकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. त्याला दिल्लीने ३० लाखांना ताफ्यात सामील केलं आहे.
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा