-
आयपीएल २०२६ स्पर्धेआधी पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये अनुभवी खेळाडूंपेक्षा युवा खेळाडूंना जास्त भाव मिळाला. अन्कॅप्ड खेळाडूंव कोटींमध्ये बोली लागली. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनवर आयपीएल २०२६ स्पर्धेच्या ऑक्शनमध्ये सर्वात मोठी लागली. यासह तो आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. दरम्यान कोण आहेत, सर्वाधिक बोली लागलेले टॉप ५ विदेशी खेळाडू? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीनवर कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटींची बोली लावली. यासह तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
याआधी २०२४ मध्ये झालेल्या ऑक्शनमध्ये स्टार्कवर २४.७५ कोटींची विक्रमी बोली लागली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर २०२४ च्या ऑक्शनमध्ये २०.५० कोटींची बोली लागली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सॅम करनवर पंजाब किंग्जने १८.५० कोटींची बोली लावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानानला कोलकाता नाईट रायडर्सने १८ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या