-
२०२५ हे वर्ष महिला क्रिकेटचं वर्ष होतं, असं म्हणायला हरकत नाही. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि यामुळे महिला क्रिकेटच्या प्रसिद्धीमध्ये वाढ पाहायला मिळाली. आपल्या कामगिरीने व सौंदर्याने लक्ष वेधून घेणाऱ्या १० महिला क्रिकेटर्स कोण आहेत, पाहूया.
-
१.स्मृती मानधना-नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली स्मृती मानधना तिची उत्कृष्ट फलंदाजी, साधेपणा व तिच्या ड्रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे. यासह स्मृती यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी महिला क्रिकेटपटूही आहे.(फोटो-@Smritimandhana)
-
२.एलिस पेरी-ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिचे फिटनेस शूट आणि क्रिकेट पुरस्कारांमध्ये रेड कार्पेटवरील तिचे लुक्स व्हायरल होतात. ती भारतीय चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहे.(फोटो-@ellyseperry)
-
३.हरलीन देओल-भारताची मधल्या फळीतील फलंदाज हरलीन देओल तिच्या ऑफ फिल्ड ड्रेसिंगमुळे अधिक लोकप्रिय झाली. तिचं सौंदर्य आणि मैदानावर कॅच पकडण्यासाठी तिचे डाईव्ह प्रसिद्ध आहे.(फोटो-@Harleendeol)
-
४.अमेलिया कर-न्यूझीलंडची फिरकीपटू व फलंदाज अमेलिया कर तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे ती भारत आणि न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक बनली आहे.(फोटो-@meliakerr)
-
५.लॉरा वोल्वार्ड-दक्षिण आफ्रिकेची कर्णधार व सलामीवीर लॉरा तिच्या मैदानावरील कामगिरीसाठी अधिक प्रसिद्ध आहे आणि तिच्या लुक्सने अनेकांचं लक्ष वेधते.(फोटो-@Laurawolaardt)
-
७.लॉरेन बेल-इंग्लंडची सर्वात सुंदर क्रिकेटपटू म्हणून लॉरेन बेलला ओळखलं जातं. तिच्या उंच उंचीमुळे आणि आकर्षक फिचर्समुळे ती गुगल सर्चमध्ये आपला दबदबा राखताना दिसली.(फोटो-@Laurenbell)
-
८.चार्ली डीन-इंग्लंडची फिरकीपटू तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसह तिच्या स्माईलमुळे सर्वांना घायाळ करते.(फोटो-@charliedean)
-
६.एलिस कॅप्सी-इंग्लंडची तरूण क्रिकेटपटू आपल्या सौंदर्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ती WPL मध्ये तिच्या स्टायलिश लुकसाठी ट्रेंडमध्ये होती. चाहते तिला अनेकदा इंग्लिश क्रिकेटमधील ग्लॅमरचा “नवीन चेहरा” म्हणून संबोधतात.(फोटो-@Alicecapsey)
-
९.जेमिमा रॉड्रीग्ज-भारताची छोटा पॅकेड बडा धमाका असलेली जेमिमा रॉड्रीग्ज तिचा क्युटनेस, बिनधास्त, मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते. जेमिमा स्मृतीबरोबर २०२५ मध्ये सर्वाधिक गुगलवर सर्च केली जाणारी खेळाडू ठरली.(फोटो-@Jemimahrodrigues)
-
१०.एनेरी डर्कसन-दक्षिण आफ्रिकेची एमनेरी डर्कसन महिला विश्वचषक २०२५ दरम्यान खूप प्रसिद्धीझोतात आली. तिची मैदानावरील कामगिरी आणि तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं.(फोटो-@Annikederksan)
बांगलादेशमध्ये हिंदू युवकाला झाडाला बांधून जाळलं, युनूस सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “इथे हिंसेला…”