-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा आणि येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीदरम्यान काही धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. कोणते आहेत ते निर्णय? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सर्वात मोठा निर्णय म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आलेल्या शुबमन गिलला टी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गिल बाहेर झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या स्पर्धेसाठी रिंकू सिंगला संघात स्थान देण्यात आलं आहे. आशिया चषकानंतर त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांना संधी देण्यात आली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आणखी एक मुख्य बाब म्हणजे जितेश शर्माला देखील टी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”