-
भारताची बॅडमिंटन क्वीन पीव्ही सिंधू हिच्या लग्नाचे काही नवे फोटो तिने शेअर केले आहेत. पण ज्याठिकाणी तिचं लग्न झालं तेथील हॉटेलच्या सूटच्या एका दिवसाची किंमत ७.५ लाख आहे.
-
भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने तिच्या लग्नाच्या एनिव्हर्सरीनिमित्त खास पोस्ट शेअर केली.
-
सिंधूने उद्योगपती वेंकट दत्ता साई याच्याबरोबर लग्नागाठ बांधली. सिंधूने तिच्या लग्नाचे काही खास फोटो पहिल्या एनिव्हर्सरीच्या निमित्ताने शेअर केले.
-
गेल्या वर्षी २२ डिसेंबर २०२४ रोजी दोघांनीही लग्नगाठ बांधत आणि आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू केला. सिंधूने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये माझा साथीदार, मित्र, पती झाल्याबद्दल तुझे आभार असं म्हणत भावुक कॅप्शन लिहिलं आहे.
-
सिंधू व वेंकट दत्ता साई यांनी उदयपूरमध्ये एकदम रॉयल विवाह केला होता.
-
भारतातील सर्वात मोठं आयलँड रिसॉर्ट असलेल्या राफेल्स उदयपूर येथे लग्नगाठ बांधली, जे उदय सागर तलावावर स्थित आहे. याचठिकाणी ये जवानी है दिवानी चित्रपटातील लग्नाचा सोहळा शूट केला होता.
-
सिंधूने लग्नगाठ बांधलेल्या राफेल्स उदयपूरमधील एका सूटची किंमत एका दिवसाची किंमत तब्बल ७.५ लाख रूपये आहे.
-
सिंधूने व वेंकट दत्ता साईने त्यांच्या लग्नापूर्वीचे सर्व विधी इथेच केले होते. त्यांच्या हळदीचे फोटोदेखील समोर आले आहेत.(फोटो-@PVSindhu @rvrpro)
डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत संपूर्ण शरीरात पसरला संसर्ग; २८ वर्षांच्या तरुणीचा ऑफिसच्या धावपळीत ‘या’ एका सवयीमुळे मृत्यू, तुम्हीही अशीच चूक करता का?