-
भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातही शफाली वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. यासह तिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात मिताली राजला मागे टाकलं आहे. पाहा सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय महिला संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्मृती मानधना अव्वल स्थानी आहे. तिने ४०२२ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या हरमनप्रीत कौरने ३७०० धावा केल्या आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत जेमिमा रॉड्रिग्ज तिसऱ्या स्थानी आहे. तिच्या नावे २४७९ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चौथ्या स्थानी असलेल्या शफाली वर्माने आतापर्यंत २३७८ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर मिताली राजच्या नावे २३६४ धावा करण्याची नोंद आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष