-
बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदूंवरील अत्याचार वाढत आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
याचे पडसाद आता भारतात उमटू लागले आहेत. एका धार्मिक नेत्याने थेट आयपीएलचे सामने उधळून लावण्याची धमकी दिली आहे. जर बांगलादेशचे खेळाडू भारतात खेळतील, तर मैदानावरील खेळपट्टी उखडू असा इशारा देण्यात आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान आयपीएल २०२६ स्पर्धेत बांगलादेशचे किती खेळाडू खेळताना दिसणार आहेत? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये बांगलादेशच्या ७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ज्यात तस्किन अहमद, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, नाहिद राणा, रकिबुल हसन, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पण यापैकी फक्त मुस्तफिजुर रहमानवर बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ९.२० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ