-
भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला एकही टी-२० मालिका गमावू दिली नाही.
-
बॉलीवूड अभिनेत्री खुशी मुखर्जी हिने “सूर्यकुमार यादव मला सतत मेसेज करायचा” असं वक्तव्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पण ही अभिनेत्री नेमकी कोण आहे, जाणून घेऊया.
-
गेल्या काही काळापासून खुशी मुखर्जी तिच्या फॅशनमुळे व वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केलं जातं.
-
खुशी मुखर्जी हिने साऊथ चित्रपटांमध्ये काम करत आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली.
-
तिचा पहिला चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट अंजल थुराई होता. त्यानंतर ती हार्ट अटॅक आणि डोंगाप्रेमा या तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली.
-
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत ओळख मिळवल्यानंतर, खुशीला हिंदी चित्रपट ‘श्रृंगार’ मध्ये भूमिका मिळाली. त्यानंतर खुशी टेलिव्हिजनकडे वळली.
-
खुशी मुखर्जी एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सव्हिला १०’ आणि ‘लव्ह स्कूल ३’ मध्ये दिसली आहे. पौराणिक टीव्ही मालिका जय बजरंगबली व्यतिरिक्त, तिने देविका, बलवीर सारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं. दरम्यान काही बोल्ड बेवसीरीजमध्येही तिने काम केलं आहे.(फोटो सौजन्य-)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या