-
आयसीसी क्रमवारीत २०२५ मध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसला. वर्षाअखेरीस भारताचे ६ खेळाडू क्रमवारीत पहिल्या स्थानी आहेत.
-
भारतीय संघ दोन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. टी-२० आणि वनडे क्रमवारीत भारतीय संघ जगातील अव्वल संघ आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
-
एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा ७८१ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
-
अभिषेक शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत जगातील नंबर वन खेळाडू आहे.
-
जसप्रीत बुमराह ८७९ रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत जगातील उत्कृष्ट खेळाडू असून पहिल्या स्थानी आहे.
-
टी-२० क्रिकेटमधील आपल्या ८०४ गुणांच्या हायेस्ट रेटिंगसह वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानी आहे.
-
रवींद्र जडेजा हा कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे.
-
भारतीय महिला संघातील खेळाडू दीप्ती शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्ससह गोलंदाजांच्या क्रमवारीत देखील पहिल्या स्थानी आहे.(फोटो-@BCCI-X)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!