-
आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. केकेआरने आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आपल्या संघात स्थान दिलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान बांगलादेशमध्ये हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. भारतात बांगलादेशविरोधात आंदोलनं सुरू आहेत. यादरम्यान सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे, मुस्तफिजूर रहमान. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुस्तफिजूर रहमान हा बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील गोलंदाज आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ९.२० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रूपये इतकी होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुस्तफिजूर रहमानला आयपीएल स्पर्धा खेळू देणार नाही किंवा त्याला खेळू देऊ नका, अशी मागणी अनेकांनी केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुस्तफिजूर रहमानला २०१६ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने हैदराबादला पहिले जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. हैदराबादकडून खेळल्यानंतर तो २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून आला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्लीचा भाग बनला.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आगामी हंगामासाठी त्याची कोलकाता नाईट रायडर्स संघात निवड झाली आहे. त्याच्याकडे १२६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. यादरम्यान त्याने १५८ गडी बाद केले आहेत. तर आयपीएलमध्ये ६० सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ६५ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय