-
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील अखेरचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात असून या सामन्यात जो रूटने वादळी दीडशतकी खेळी केली.(फोटो सौजन्य-इंग्लंड क्रिकेट-X)
-
जो रूटने २०२६ ची धमाकेदार सुरूवात करत २४२ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १६० धावांची खेळी केली, या खेळीसह इंग्लंडने ३८४ धावा पहिल्या डावात केल्या आहेत.(फोटो सौजन्य-इंग्लंड क्रिकेट-X)
-
जो रूटने ४१वं कसोटी शतक करत सर्वाधिक शतकांच्या विक्रमात संयुक्तपणे तिसरं स्थान गाठलं आहे.(फोटो सौजन्य- Yorkshire-X)
-
सचिन तेंडुलकरने कसोटी कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळत ३२९ डावांमध्ये ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे.(फोटो सौजन्य-लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
तर जो रूटने १६३ कसोटी सामन्यांच्या २९७ डावांमध्ये १३,९३७ धावा केल्या आहेत. जो रूट या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.(फोटो सौजन्य-इंग्लंड क्रिकेट-X)
-
कसोटीत सर्वाधिक धावांचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी जो रूटला फक्त १९८४ धावा करायच्या आहेत.(फोटो सौजन्य-लोकसत्ता संग्रहित फोटो)
“उद्धव ठाकरेंना राग आला आणि त्यांनी…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?