-
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरूद्ध घरच्या मैदानावरील मालिकेनंतर ती निवृत्त होणार आहे.
-
आठ वेळची वर्ल्डकप विजेती खेळाडू असलेली एलिसा हिली ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे, या पॉवर कपलची लव्ह स्टोरी जाणून घेऊया.
-
एलिसा व मिचेल स्टार्क ९ वर्षांचे असताना एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. क्लब क्रिकेटमध्ये ते दोघेही एकमेकांविरूद्ध खेळेले होते. एलिसाची आई क्रिकेटपटू होती तर स्टार्कचे बाबा प्रशिक्षक होते.
-
लहानपणापासून दोघांना क्रिकेटची आवड होती. एकदा सिडनी डिस्ट्रिक्ट ज्युनियर क्रिकेट असोसिएशनमध्ये दोघेही एकमेकांविरूद्ध सामना खेळला होता.
-
पहिलाच सामना एकमेकांविरूद्ध खेळल्यानंतर ते दोघेही एकाच संघात असल्याचं त्यांना कळलं. या संघाचं कोचिंग स्टार्कचे वडील पॉल करत होते. त्या दोघांनी अंडर-१० पासून अंडर-१६ क्रिकेट एकत्र खेळले.
-
लहानपणापासूनच ते दोघांचे मित्र व संघसहकारी होते. यादरम्यान स्टार्कला एलिसा हिली आवडू लागली होती, असा खुलासा त्याने २०१३ मध्ये एका मुलाखतीत केला होता.
-
या दोघांची मैत्री कालांतराने वाढत गेली. एलिसा व स्टार्क एकत्र वेळ घावलवत असत. ती एनएसडब्ल्यूमधून हॉकी खेळत होती, तर मिचेल नॅशनल परफॉर्मन्स स्क्वॉडमध्ये सराव करत होता. यानंतर एलिसासाठी टूर्नामेंट चांगली गेली नाही, तेव्हा दोघेही ड्रिंक्ससाठी बाहेर गेले होते. यानंतर दोघेही एकत्र वेळ घालवू लागले.
-
स्टार्क व एलिसाचं नातं अगदी सहजपणे जुळलं. मिचेल कारकिर्दीतील पहिल्या क्रिकेट दौऱ्यासाठी निघण्याच्या आठवडाभर आधी त्याला जाणवलं की, गेले काही दिवस तो व एलिसा सातत्याने एकमेकांना भेटत आहोत.
-
स्टार्कने शेवटी हिंमत करून एलिसाला थेट विचारलं की, ‘आपण आता डेट करत आहोत का?’ आणि इथून त्यांच्या नात्याला सुरूवात झाली.
-
यानंतर २०१५ मध्ये स्टार्क व एलिसा या दोघांनी साखरपुडा केला आणि २०१६ मध्ये ते विवाहबंधनात अडकले.(फोटो सौजन्य-@Alyssa Healy Instagram)
सोनिया गांधींना भारताची ओळख करून देण्यासाठी राजीव गांधींनी सत्यजित रे यांचा सिनेमा का निवडला?