-
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. याचबरोबर त्याची लव्हस्टोरीदेखील चर्चेत राहिली.
-
झहीर खानने बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याबरोबर लग्न केलं. सागरिका व झहीरची लव्हस्टोरी कमाल होती. सागरिका व झहीर खान यांचं आंतरधर्मीय लग्न झाले आहे.
-
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केलं. मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही.
-
काही वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या.
-
झहीर-सागरिका नंतर अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. आयपीएलमध्येही सागरिका झहीरच्या संघासाठी चिअर करताना दिसली होती.
-
झहीर खानच्या घरच्यांनी सागरिका घाटगेचा प्रसिद्ध चक दे इंडिया चित्रपट पाहत त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. सागरिकाची ‘चक दे इंडिया’मधील भूमिका चांगलीच गाजली होती. सागरिका अभिनेत्रीबरोबरच राष्ट्रस्तरिय हॉकीपटू राहिली आहे.
-
सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक आहे. तिचे वडील विजयेंद्र घाटगे हे कागल राजघराण्यातील होते.
-
तर सागरिकाची आजी सीता राजे घाटगे या इंदूरच्या महाराजांच्या वंशज होत्या. त्यामुळे सागरिका घाटगेचा संबंध कोल्हापूर आणि इंदूर या दोन्ही राजघराण्यांशी येतो, तसेच ती कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचीही नातेवाईक ठरते.
-
झहीर खान हा सागरिका घाटगेपेक्षा उत्तम मराठी बोलतो, असा खुलासा तिनेच एका मुलाखतीत केला होता. झहीरचं मराठी ऐकूनही तिच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी तयार झाले होते.
-
सागरिका घाटगेने तिचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे, ज्याचं नाव ‘आकुती इंडिया’ असं आहे. ज्यामध्ये ती एकापेक्षा एक सुंदर हँडपेंट केलेल्या साड्या, ड्रेस व पुरूषांचे आऊटफिट विकते.(फोटो सौजन्य-@SagarikaGhatge, @Zaheerkhan)
‘झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं’, गाण्यावर तरूणींनी धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अंगभर पेहराव करून…”