-
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२०जानेवार) खेळवला जाईल. दरम्यान कोण आहेत भारत- न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितने १७ सामन्यांमध्ये ५११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३४.०६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत केएल राहुल दुसऱ्या स्थानी आहे. केएल राहुलने न्यूझीलंडविरूद्ध खेळताना ८ सामन्यांमध्ये ३२२ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटने न्यूझीलंडविरूद्ध खेळताना ३११ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या स्थानी आहे. सूर्याच्या नावे ८ सामन्यांमध्ये २८४ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पाचव्या स्थानी असलेल्या श्रेयस अय्यरने १३ सामन्यांमध्ये २२५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे