-
वनडे मालिका झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान कोण आहेत भारत- न्यूझीलंड टी-२० मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत अव्वल स्थानी आहे. जसप्रीत बुमराहने १० सामन्यांमध्ये १२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या युझवेंद्र चहलने १४ सामन्यांमध्ये ११ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भारत- न्यूझीलंड मालिकेत गोलंदाजी करताना ११ सामन्यांमध्ये ९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या अर्शदीप सिंगने देखील ९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या हार्दिक पंड्याच्या नावे देखील १३ सामन्यांमध्ये ९ गडी बाद करण्याची नोंद आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
भटक्या कुत्र्यांबाबत मनेका गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा संताप, “तुम्ही…”