-
येत्या काही दिवसात आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेतही विक्रमांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये अनेक शतकं झळकावली आहेत. पण टी-२० वर्ल्डकपमध्ये असा एकच फलंदाज आहे, जो भारतासाठी शतक झळकावू शकला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून डावखुऱ्या हाताचा स्फोटक फलंदाज सुरेश रैना आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सुरेश रैनाने १ मे २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना ही विक्रमी शतकी खेळी केली होती. त्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला या स्पर्धेत शतक झळकावता आलेलं नाही. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रैनाने ६० चेंडूत १०१ धावांचा स्फोटक खेळी केली होती. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ५ षटकार खेचले होते. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रैनानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज फलंदाज शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचले, पण ते शतक झळकावू शकलेले नाहीत. यावेळी हा विक्रम मोडला जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
नागपूर-गोवा एक्सप्रेस आता कायमस्वरूपी! २४ डब्यांची एक्सप्रेस आणि प्रमुख शहरांचे थांबे; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक