-
स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाने वुमन्स प्रीमियर लीग २०२६ मध्ये सुरूवातीचे पाचही सामने जिंकत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. संघाच्या या कमालीच्या कामगिरीसह आरसीबी व्यवस्थापनाने खेळाडूंसाठी ‘मेट गाला’ चं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये खेळाडूंच्या लुक्सने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
-
स्मृती मानधना या आरसीबीच्या मेट गाला कार्यक्रमासाठी काळ्या रंगाच्या छान साडीमध्ये तयार होऊन आली होती. तिच्या लुक्सने सर्वांचं लक्ष वेधलं.
-
आरसीबीची स्टार गोलंदाज ठरलेली लॉरेन बेल पिवळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये खुलून दिसतेय. चाहत्यांनी तिला प्रेमाने सनफ्लॉवर असं म्हटलं आहे.
-
आरसीबीची आक्रमक सलामीवीर फलंदाज ग्रेस हॅरिसदेखील काळ्या रंगाची वेस्टर्न साडी घालून पार्टीला पोहोचली होती.
-
रिचा घोष निळ्या रंगाचा स्लिट गाऊन परिधान करत पोहोचली होती. रिचा फार कमी वेळेस मेकअप आणि अशा लुक्समध्ये दिसत असते.
-
श्रेयंका पाटीलने चमकणाऱ्या वनपीस व बुट्समध्ये एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत होती.
-
राधा यादवदेखील जॅकट प्लाजो लुकमध्ये खुलून दिसत होती. राधाच्या पेन्सिल हिल्सने देखील सर्वाचं लक्ष वेधलं.
-
जॉर्जिया वॉल लाल रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान करत या पार्टीसाठी पोहोचली होती.
-
आरसीबीची पॉवर हिटर नादिन दे क्लार्क हिरव्या रंगाचा गाऊन घालून उपस्थित होती. क्लार्कच्या गोड स्माईलने सर्वांचं लक्ष वेधलं.
-
ग्रेस हॅरिस, नादिन दे क्लार्क, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल, जॉर्जिया वॉल यांचा हातात ड्रिंक्स असलेला एक ग्रुप फोटोदेखील शेअर केला आहे.(फोटो सौजन्य-RCB Instagram)
अरे बापरे! १७ मेपर्यंत ‘या’ राशींच्या लोकांची शनी साडेसातीतून सुटका नाहीच? पैसे घरात येतील पण टिकणार नाहीत? खिसा रिकामा होण्याची भीती?