-
विजय अमितराज जे भारतीय माजी टेनिसपटू आहेत. त्यांना टेनिसमधील त्यांच्या योगदानासाठी सर्वाेच्च पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
हरमनप्रीत कौर भुल्लार भारताच्या महिला संघाची कर्णधार जिच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पहिला वर्ल्डकप पटकावला. भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप पटकावून देणारी ती पहिली कर्णधार ठरली.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
रोहित शर्मा भारताचा माजी कर्णधार ज्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने उत्तरोत्तर प्रगती केली. टी-२० विश्वचषक २०२४ व चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ त्याने संघाला पटकावून दिलं. याशिवाय त्याच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याला हा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
प्रवीण कुमार हा भारताचा हाय जम्पमधील पॅरा अॅथलिट आहे. ज्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं. तर एशियन पॅरा गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
सविता पुनिया भारताची महिला हॉकी संघाची गोलकिपरला तिच्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
व्लादिमीर मेस्तविरिशविली जॉर्जियन कुस्ती प्रशिक्षक यांना मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्यात येईल. व्लादिमीर मेस्तविरिशविली यांनी भारताच्या कुस्तीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
बलदेव सिंग यांनी महिला हॉकीचं चित्र खऱ्या अर्थाने पालटलं. ज्यांनी स्वखर्चाने भारतासाठी हॉकी क्षेत्रातील महिला स्टार खेळाडू घडवल्या, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.(फोटो-@NavinSports-X)
-
भगवानदास रायकवार यांना पारंपारिक मार्शल आर्टमधील योगदानाबद्दल पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. याशिवाय के. पजनेवेल हे देखील या पुरस्काराचे मानकरी ठरले.(फोटो-एक्सप्रेस, लोकसत्ता संग्रहित फोटो)
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…