-
भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी शुक्रवारी सकाळी तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन, दर्शन घेतले.
-
भारताचा टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यापूर्वी या ऐतिहासिक मंदिरात पूजा-अर्चा करताना दिसला.
-
अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यानेही संघातील सहकाऱ्यांसोबत दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या मंदिरात आशीर्वाद घेतले.
-
फलंदाज रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती हेदेखील मंदिरात दर्शनासाठी उपस्थित होते.
-
फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांनीही मंदिरातील पूजा विधींमध्ये सहभाग घेतला.
-
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप हेही या आध्यात्मिक भेटीदरम्यान संघासोबत होते.
-
मंदिर परिसरात सर्व खेळाडूंनी पारंपरिक वेश परिधान केला असून, त्यांनी ठरवलेल्या धार्मिक संकेतांचे पालन करीत पूजा केली.
-
संघाने सुमारे ३० मिनिटे मंदिर परिसरात घालवून, त्यानंतर सामन्याच्या तयारीकडे मोर्चा वळवला.
-
ही भेट न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी झाली असून, मालिकेत भारताने आधीच ३-१, अशी आघाडी घेतली आहे.
-
त्यानंतर भारतीय संघाचे लक्ष आता आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे असणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान खेळवली जाणार आहे. (सर्व फोटो सौजन्य :PTI)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
