-
आरसीबीची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील सध्या क्रिकेटच्या मैदानातून ब्रेक घेऊन सुट्यांचा आनंद घेत आहे.
-
श्रेयंकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रेयंकासोबत भारतीय महिला क्रिकेट संघातील तिच्या खास मैत्रिणी स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स व राधा यादव दिसत आहेत.
-
फोटोंमध्ये श्रेयंकाने निळ्या रंगाचा स्टायलिश वन-पीस ड्रेस परिधान केला असून, ती अत्यंत फ्रेश आणि आनंदी दिसत आहे.
-
या ‘गर्ल्स गँग’ने समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकवर बसून निवांत गप्पा मारतानाचा आणि सूर्यास्ताचा आनंद लुटतानाचा वेळ कॅमेऱ्यात कैद केला आहे.
-
श्रेयंकाने या पोस्टला ‘Swalpa chill scene done. Fully refreshed and recharged!’ असे मजेशीर आणि उत्साहवर्धक कॅप्शन दिले आहे.
-
फोटोंमध्ये कॅप्टन स्मृती मानधना ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे; तर जेमिमा व राधा यांनीही कॅज्युअल लूकला पसंती दिली आहे.
-
सोशल मीडियावर श्रेयंकाच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून लाखो लाईक्सचा पाऊस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेयंका पाटील/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
