-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेतील बहुतांश सामने भारतात खेळवले जाणार आहेत. त्यामुळे फलंदाजांची चांदी होणार आहे. कारण भारतातील खेळपट्ट्या या फलंदाजीसाठी अनुकूल आहेत. फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पाडला जाऊ शकतो. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ३३ सामन्यांमध्ये ६३ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने ४७ सामन्यांमध्ये ५० षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जोस बटलर तिसऱ्या स्थानी आहे. बटलरने ३५ सामन्यांमध्ये ४३ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ४१ सामन्यांमध्ये एकूण ४० षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नावे ३५ सामन्यांमध्ये ३५ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
