-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्मा सलामीवीर फलंदाज म्हणून खेळणार, हे तर निश्चित आहे. पण दुसरा सलामीवीर फलंदाज कोण असेल हे अजूनही निश्चित झालेलं नाही. इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं करून दमदार शतक झळकावलं. तर संजू सॅमसन पाचही सामन्यांमध्ये प्लॉप राहिला. दरम्यान सलामीवीर फलंदाज म्हणून कसा आहे, दोघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इशान किशनला टी-२० क्रिकेटमध्ये २२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान १४६ सामन्यांमध्ये त्याने डावाची सुरूवात केली आहे. डावाची सुरूवात करताना त्याने ३२.२६ च्या सरासरीने फलंदाजी करताना ४३८८ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर संजू सॅमसनला ८१ सामन्यांमध्ये डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २९.८४ च्या सरासरीने २२३८ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इशान किशन आणि संजू सॅमसन दोघेही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. इशान किशनने डावाची सुरूवात करताना ५ शतकं आणि २४ अर्धशतकं झळकावली आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर संजू सॅमसनने डावाची सुरूवात करताना ३ शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सलामीवीर फलंदाज म्हणून नाबाद ११३ धावा ही इशान किशनची सर्वाधिक खेळी आहे. तर संजू सॅमसनने १११ धावांची खेळी केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
