-
माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी, मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या कोल्हापुरात कुटुंबासह वेळ घालवत आहेत. सागरिकाने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या पोस्टमध्ये झहीर खान, सागरिका घाटगे आणि त्यांचा मुलगा फतेहसिंह खान मंदिर दर्शन करताना दिसत आहेत. कौटुंबिक आणि अध्यात्मिक वातावरणाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
सागरिकाने कॅप्शनमध्ये “Back in Kolhapur – where it all feels familiar and grounding” असे लिहित कोल्हापूरशी असलेले भावनिक नाते व्यक्त केले आहे.
-
सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक आहे. तिचे वडील विजयेंद्र घाटगे हे कागल राजघराण्यातील होते.
-
या पोस्टनुसार, सागरिका आणि झहीर यांनी कागल येथील राम मंदिरात दर्शन घेतले. हे मंदिर अनेक पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले असल्याचे तिने नमूद केले आहे.
-
सागरिकाने कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर आणि हजरत गाइबी पीर दर्ग्यालाही भेट दिल्याचा उल्लेख कॅप्शनमध्ये केला असून, लहानपणापासून या ठिकाणांशी असलेली जवळीक तिने सांगितली आहे.
-
फोटोंमध्ये सागरिका पारंपरिक साडीमध्ये दिसत असून तिचा साधा, सोज्वळ लूक चाहत्यांना विशेष भावला आहे. मंदिरातील शांत वातावरणात तिचा लूक अधिक खुलून दिसतो.
-
झहीर खान पांढऱ्या पारंपरिक पेहरावात दिसत असून मुलगा फतेहसिंह खानला कुशीत घेऊन तो दर्शन घेताना दिसतो. हा क्षण अनेकांसाठी भावूक करणारा ठरला.
-
सागरिकाने कॅप्शनमध्ये घर, बाग, मोकळी जागा आणि पाळीव कुत्र्यांसोबत घालवलेले क्षणही नमूद करत, कोल्हापुरात आल्यावर सगळं आपोआप पूर्ववत होतं, अशी भावना व्यक्त केली आहे. (सर्व फोटो सौजन्य: सागरिका घाटगे /इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “…तेव्हाच मी पुन्हा सोने-चांदी खरेदी करेन”, किंमत कोसळत असताना रॉबर्ट कियॉसाकी यांची पोस्ट चर्चेत
