-
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १०० धावांनी दमदार विजय मिळवला. यासह सहाव्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. दरम्यान कोण आहेत ही स्पर्धा जिंकणारे भारतीय कर्णधार? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघाने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्यांदाच अंडर- १९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २००८ अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चार वर्षांनंतर उन्मु्क्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०१२ अंडर- १९ वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
२०१८ मध्ये पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर २०२२ मध्ये यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आता आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने भारतीय संघाने अंडर १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
SRH vs RR: “हा पुरस्कार मी…”, स्वप्नवत पदार्पण करणाऱ्या प्रफुल हिंगेने सामनावीर अवॉर्ड कोणाला समर्पित केला? सामन्यानंतर म्हणाला…