-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. पण विजय मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. सूर्यकुमार यादवला वगळलं, तर फलंदाजीत इतर कुठल्या फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत विकेट्स काढून दिल्या. दरम्यान कोण आहेत, भारतासाठी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी आहे. अश्विनने २४ सामन्यांमध्ये ३२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. अर्शदीप सिंगने १५ सामन्यांमध्ये २९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अश्विनचा टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अर्शदीपला ४ विकेट्सची गरज आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे . बुमराहने १८ सामन्यांमध्ये २६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर हार्दिक पांड्या या यादीत चौथ्या स्थानी आहे. हार्दिकने २२ सामन्यांमध्ये २४ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!