-
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. त्याची प्रेयसी माहिका शर्मा हिने शेअर केलेल्या फोटोने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.
-
माहिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हार्दिकचा गुलाबांच्या मोठ्या पुष्पगुच्छासह फोटो पोस्ट केला. या फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
-
फोटोमध्ये हार्दिक बेडवर बसून कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतो. त्याचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांना भावला आहे.
-
“Made it to Delhi in time. Man of the match of my life!!” अशी तिने कॅप्शन दिली आहे.
-
माहिकाच्या स्टोरीनंतर हार्दिकनेही ती रिपोस्ट करत “Valentine and my baby’s birthday week starts ” असे लिहिले, यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
-
हे दोघे अनेकदा एकत्र प्रवास करताना दिसतात. विमानतळावर त्यांच्या उपस्थितीची छायाचित्रे नेहमी व्हायरल होत असतात.
-
माहिका शर्मा ही २४ वर्षांची मॉडेल असून तिने अर्थशास्त्र आणि वित्तशास्त्रात शिक्षण घेतले आहे. अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रातही ती सक्रिय आहे.
-
व्हॅलेंटाईन डेच्या आधी आलेल्या या पोस्टमुळे हार्दिक आणि माहिकाची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा/इन्स्टाग्राम)
केतू मागाल तेवढा पैसा देणार, नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव ‘या’ चार राशींवर पडणार… भाग्याची साथ पदोपदी लाभणार
