-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने ४ पैकी ४ सामने जिंकले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये अभिषेक शर्माला खेळण्याची संधी मिळाली. पण या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर माघारी परतला आहे. यासह त्याच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. दरम्यान कोण आहेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहित आतापर्यंत १५१ डावात १२ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेला विराट कोहली ११७ डावात ७ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संजू सॅमसन देखील ७ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर अभिषेक शर्माच्या नावे ६ वेळा शून्यावर बाद होण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील ६ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”