-
वरूण चक्रवर्ती टी-२० विश्वचषकात भारतासाठी गेमचेंजर खेळाडू ठरत आहे, त्याने प्रत्येक सामन्यात महत्त्वपूर्ण विकेट्स घेत संघाच्या विजयात मोठं योगदान दिलं आहे.
-
मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीच्या क्रिकेटपटू होण्याचं श्रेय त्याच्या पत्नीला देखील जातं. जिने वरूणला त्याचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. “तू क्रिकेट खेळ, मी कमावते; आपण मॅनेज करू” या शब्दात तिने वरूणला आत्मविश्वास दिला.
-
वरूण चक्रवर्तीने आर्किटेक्ट म्हणून त्याची नोकरी सोडून क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. त्याच्या या निर्णयाला तिने पाठिंबा दिला.
-
वरूण चक्रवर्ती व त्याची पत्नी कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले होते आणि या त्यांच्या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं.
-
वरूण चक्रवर्तीची पत्नी ही मराठमोळी आहे, जिचं नाव नेहा खेडेकर असं आहे. नेहा मूळची मुंबईची आहे.
-
वरूण चक्रवर्ती हा मूळचा चेन्नई तामिळनाडू येथील आहे. त्याचे बाबा तमिळ आहेत, तर आई मल्याळी आहे.
-
नेहा खेडेकर मुंबईतील साध्या कुटुंबातून आलेली असून तिला फोटोग्राफी, प्रवास आणि क्रिकेट यांची आवड आहे. ती सोशल मीडियावरही खूप खाजगी जीवन जगते. वरूण प्रसिद्ध क्रिकेटपटू झाला असला तरी नेहा मात्र खाजगी जीवन जगते, त्यामुळे तिच्या करियरबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.
-
वरूण आणि नेहाने १२ डिसेंबर २०२० ला लग्न केलं आणि दोन वर्षांनंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांना मुलगा झाला, ज्याचं नाव आथमन आहे.(फोटो सौजन्य-@VarunChakravarthy Instagram)
तुमच्या त्वचेवर दिसतायत ‘हे’ ६ बदल? सावध राहा! किडनी खराब होण्याचा असू शकतो पहिला इशारा
