-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. पण सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पुढील सामना तुफान फॉर्ममध्ये असलेल्या झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान या सामन्याआधी जाणून घ्या कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारत आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यादरम्यान भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर झिम्बाब्वेला ३ सामने जिंकण्यात यश आले आहे. तर १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…