-
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांबरोबर अनेक फोटो, व्हीडिओदेखील शेअर करते.
-
सध्या तेंडुलकरांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. साराचा धाकटा भाऊ अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोकबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.
-
येत्या ५ मार्चला अर्जुन व सानिया लग्नबंधनात अडकतील अशी माहिती रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. यासाठी सचिनचं मुंबईतील घरदेखील सजवल्याचे व्हीडिओ समोर आले.
-
५ मार्चला होणाऱ्या लग्नसोहळ्यापूर्वी या दोघांच्या लग्नपूर्वीच्या विधींना सुरूवात झाल्याची हिंट साराने शेअर केलेल्या फोटोंमधून मिळत आहे.
-
साराने इन्स्टाग्रामवर मराठी मुलगी अलर्ट म्हणत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती साडी नेसलेली दिसत आहे.
-
साराने निळ्या रंगाची साडी नेसली असून तिथे गळ्यात छान दागिने, हातात बांगड्या, कपाळाला सुंदरशी टिकली व नथदेखील घातली आहे.
-
साराने साडीवरचा मराठमोळा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस बांधले असून फुलांनी हा लुक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य-@SaraTendulkar Instagram)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…