-
T20 World Cup 2026 Match Updates: टी-२० विश्वचषक २०२६ आता आपल्या निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे.
-
या स्पर्धेतील हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीचे सामने ४ आणि ५ मार्च रोजी रंगणार असून, महाअंतिम सामना ८ मार्चला पार पडणार आहे.
-
आज (४ मार्च) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे.
-
दरम्यान, भारताच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी टीम इंडियाचे शिलेदार ईशांत किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन ‘श्रीं’चे आशीर्वाद घेतले.
-
यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद सरवणकर यांनी खेळाडूंचे स्वागत केले.
-
त्यांनी तिन्ही क्रिकेटपटूंना मंदिराची वार्षिक दैनंदिनी आणि दिनदर्शिका देऊन सन्मानित केले.
-
दुसरीकडे, उपांत्य फेरीच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी भारतीय संघाने कंबर कसली असून, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रात खेळाडूंनी जोरदार घाम गाळला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धिविनायक गणपती मंदिर/इन्स्टाग्राम पेज)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…