-
भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करून स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा विजय मिळवून देण्यात अक्षर पटेलने मोलाची भूमिका बजावली. अक्षरने क्षेत्ररक्षण करत असताना २ भन्नाट झेल घेतले. या झेलमुळे सामना फिरला. दरम्यान कशी आहे अक्षर पटेलची लव्ह स्टोरी? जाणून घ्या. (फोटो- इंस्टाग्राम)
-
अक्षर पटेलच्या पत्नीचं नाव मेहा असं आहे. त्याने मेहा पटेलला पहिल्यांदा २०११ मध्ये प्रपोज केले होते. मात्र, त्या वेळी मेहाने लगेच होकार दिला नाही. अक्षरने तब्बल १० वर्षे मेहाच्या होकारासाठी आणि त्यांच्या नात्याला पुढील स्तरावर नेण्यासाठी संयमाने वाट पाहिली. (फोटो- इंस्टाग्राम)
-
बऱ्याच वर्षांच्या मैत्रीनंतर, अक्षरने आपल्या २८ व्या वाढदिवशी (२० जानेवारी २०२२) गुढघ्यावर बसून मेहाला सर्वांसमोर अधिकृतपणे प्रपोज केले. या दिवशी मेहाने ‘हो’ म्हणत हा क्षण कायमचा संस्मरणीय बनवला. (फोटो- इंस्टाग्राम)
-
या जोडीने लग्नाआधी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. त्यांच्या मते, कोणत्याही नात्यात घाई करण्यापेक्षा एकमेकांचे स्वभाव आणि विचार समजून घेणे महत्त्वाचे असते, जे त्यांच्या बाबतीत यशस्वी ठरले. (फोटो- इंस्टाग्राम)
-
अक्षर पटेलने एका मुलाखतीत सांगितले होते की, क्रिकेट ही त्याची पहिली प्राथमिकता आहे आणि त्यानंतर त्याचे आई-वडील. त्याला अशी जोडीदार हवी होती जी त्याच्या कुटुंबाला नीट समजून घेईल आणि मेहामध्ये त्याला ते सर्व गुण दिसले. (फोटो- इंस्टाग्राम)
-
दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर आणि एकमेकांना पूर्णपणे ओळखून झाल्यानंतर, अखेर जानेवारी २०२३ मध्ये अक्षर आणि मेहा विवाहबंधनात अडकले. एका साध्या मैत्रीचे रूपांतर एका सुंदर वैवाहिक आयुष्यात झाले. (फोटो- इंस्टाग्राम)
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…