-
भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाहसोहळा ५ मार्च रोजी मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडला.
-
या लग्नानंतर सचिनची सून सानिया चांडोक नेमकी कोण आहे आणि तिची पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
-
सानिया ही प्रसिद्ध उद्योगपती व चित्रपट निर्माते रवी घई यांची नात असून, ती एका अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे.
-
सोशल मीडियाच्या माहितीनुसार तिचे आजोबा रवी घई हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमधील मोठे नाव असून, ते मुंबईतील प्रसिद्ध ‘इंटर काँटिनेंटल मरीन ड्राईव्ह’ हॉटेलचे मालक आहेत.
-
एवढेच नव्हे, तर ते ‘ग्रॅव्हिस ग्रुप’चे प्रमुखही आहेत, ज्यांच्याकडे बस्किन रॉबिन्स आणि ब्रुकलिन क्रीमरी यांसारख्या लोकप्रिय आइस्क्रीम ब्रँड्सची मालकी आहे.
-
अशा कोट्यवधींच्या साम्राज्याचा भाग असूनही सानियाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.
-
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर सानियाने कौटुंबिक व्यवसायापेक्षा वेगळी वाट निवडली आणि तिच्या प्राण्यांवरील प्रेमापोटी ती ‘पेट इंडस्ट्री’कडे वळली आहे.
-
तिने स्वतःचे एक आलिशान ‘पेट स्पा सेंटर’ सुरू केले आहे, जिथे पाळीव श्वान आणि मांजरींना अत्यंत प्रीमियम दर्जाच्या सेवा आणि विशेष ट्रीटमेंट दिली जाते.
-
सानियाच्या या स्पा सेंटरची वार्षिक कमाई तब्बल ९० लाख रुपयांच्या घरात असून, ती आज एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे.
आईशप्पथ, काकू काय नाचलात… ‘राजा जी के तुरल’ गाण्यावर काकूंनी केला भोजपुरी स्टाईल डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही या वयात पण…”