-
संजना गणेशनची ओळख ही केवळ भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी इतकीच म्हणून नाही, तर ती प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. भारताच्या सामन्यावेळी तुम्ही तिला अनेकदा मैदानावर पाहिलं असेल. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
क्रिकेट या खेळाबद्दल ए टू झेड माहिती, कॉन्फिडन्स आणि स्किल्सच्या बळावर त्याने ब्रॉडकास्टिंग या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तिने आतापर्यंत वर्ल्डकप २०१९, महिला टी-२० वर्ल्डकप २०२०, टी-२० वर्ल्डकप २०२१ आणि २०२२ आणि महिला प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
माध्यमातील वृत्तांनुसार, तिला एक सामना होस्ट करण्यासाठी तब्बल २० ते ४० लाख रुपये मिळतात. ती द्विपक्षीय मालिका होस्ट करताना दिसत नाही. ती केवळ आयसीसीच्या स्पर्धा होस्ट करत असल्याने तिला मिळणारं मानधन खूप जास्त आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनची तुलना करता येणार नाही. कारण बुमराहला बीसीसीआयकडून कोट्यवधी रुपये मिळतात. यासह तो जाहिरातीतूनही कोटींची कमाई करतो.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पण एका सामन्यासाठी संजनाला मिळणारं मानधन हे बुमराहला मिळणाऱ्या मानधनापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. भारतीय संघातील खेळाडूंना एका कसोटीसाठी मॅच फी म्हणून १५ लाख रुपये दिले जातात. तर वनडेसाठी ६ लाख आणि टी-२० साठी ३ लाख रुपये दिले जातात. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!