-
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट चाहत्यांनी तुफान जल्लोष केला. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
आयसीसाकडून वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून तब्बल २७.४८ कोटी रुपये देण्यात आले होते. तर बीसीसीआयकडून रेकॉर्ड ब्रेकिंग रक्कम देण्यात आली आहे. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासाठी एकूण १३१ कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
माध्यमातील वृत्तानुसार, वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी ६-६ कोटी रूपये दिले जाणार आहेत. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
हे ६ कोटी रूपये वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असलेल्या १५ खेळाडूंना दिले जाणार आहेत. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
तर उर्वरीत १५ कोटी रूपये हे सपोर्ट स्टाफ आणि कोचिंग स्टाफमधील सदस्यांमध्ये विभागले जाणार आहेत. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS