-
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६चं जेतेपद पटकावलं. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा ९६ धावांनी एकतर्फी पराभव केला.(फोटो-BCCI-X)
-
भारतीय संघ हा टी-२० विश्वचषक तीन वेळा जिंकणारा आणि मायदेशात ही स्पर्धा जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला.(फोटो-BCCI-X)
-
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.(फोटो-BCCI-X)
-
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर हे दोन्ही खेळाडू पोहोचले होते, तेथील फोटो आता समोर आले आहेत.(फोटो-@Dev_Fadnavis)
-
मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला घट्ट मिठी मारत त्याचं अभिनंदन केलं. यानंतर दोन्ही खेळाडूंना शाल देत त्यांचा सन्मान केला.(फोटो-@Dev_Fadnavis)
-
सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी खास गप्पादेखील मारल्या.(फोटो-@Dev_Fadnavis)
-
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.(फोटो-@IANS)
-
टी-२० विश्वचषक २०२६ विजेता भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दमदार फलंदाज शिवम दुबे यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेऊन आनंद झाला. देशभरातील कोट्यवधी चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या या खेळाडूंचा सन्मान करताना आम्हा सर्वांसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण होता,” असं कॅप्शन देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टला दिलं आहे.(फोटो-@IANS)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक